रेमा साहित्य वितरक सर्व पृथ्वीवरील विश्वासणाऱ्यांचा गट आहे जो एकाच कार्यात व्यग्र आहे ते म्हणजे - उच्च दर्जाचे ख्रिस्ती साहित्य क्रियाशीलतेने वितरित करणे. १०० पेक्षा अधिक देशातून आणि २५ हून अधिक भाषांमध्ये आम्ही साध्या तत्वानुसार वितरण करतो - आमचे सर्व साहित्य पूर्णपणे मोफत दिले जाते.
अधूनमधून लोक आम्हाला आमच्या विश्वासाविषयी विचारतात, येथे आमचे विश्वासमत देत आहोत. या विश्वासाला धरुन राहणे ही आमची पुस्तके प्राप्त करण्यासाठीची आवश्यक गोष्ट नाही.
रेमामध्ये असलेले आम्ही सर्वजण त्या समाईक विश्वासाला धरून आहोत ज्यामधे सर्व विश्वासी भागी आहेत, त्या विश्वासाच्या समाविष्ट बाबी सर्वकाळसाठी एकदाच नवीन करारात सादर केल्या आहेत. विशेषतः, हा नवीन कराराचा समाईक विश्वास आम्ही ज्या पुढील गोष्टींवर विश्वास ठेवतो त्या बायबल, देव, ख्रिस्त, तारण आणि अनंतकाळ या गोष्टींचा मिळून बनला आहेः
रेमा मध्ये आमचे ध्येय आहे वाचकाची आकलन क्षमता आणि नवीन कराराच्या या विश्वासाचा अनुभव कमाल मर्यादेपर्यंत वाढवेल अशी ज्याबाबत आम्हाला खात्री आहे अशा असाधारण ख्रिस्ती साहित्याच्या संग्रहाचा मोफत पुरवठा करणे. ख्रिस्ताच्या उध्दार कार्याद्वारे विश्वासणारे ख्रिस्तातील सार्वकालिक तारणच फक्त आस्वादतात असे नाही, तर त्याच्या जीवनात दररोजचे तारणही आस्वादतात, जे बायबलमधून मिळणाऱ्या आध्यात्मिक अन्नातून प्रात्यक्षिकरित्या प्रत्ययास येते. हा आम्हाला मिळालेला अनुभव आहे; तुमचाहि असाच असेल अशी आम्ही आशा बाळगतो.
१९८०च्या मध्यावधी पासून रेमाने मोफत साहित्य वितरण केले आहे. आम्ही प्रथम बायबल आणि आध्यात्मिक पुस्तके रशियन भाषेत पूर्वीच्या सोव्हिएत संघराज्यातील देशांमध्ये वितरीत करण्यास सुरुवात केली. विनंती करणाऱ्या प्रत्येकाला साहित्य वितरणाचे आमचे प्रारंभिक साधन टपालाद्वारे होते, परंतु,अनेक ठिकाणी देवाच्या वचनातील सत्य प्रसारीत करण्यासाठी आम्ही इतर गटांसह सहकार्यसुध्दा केले.
अनेकांनी त्यांच्या भागातून आणि जगभरातून वितरण कार्यात सहभागी होण्याची अभिलाषा व्यक्त केली आहे.अधिक माहिती जाणून घेण्याकरता केलेल्या ह्या विनंत्यांचा आम्ही सन्मान करतो आणि तुम्ही आम्हासह सहभागी होऊ शकाल अशा मार्गांसह ह्या भागात प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो. आम्ही हा विभाग सहभागी होण्याच्या तीन वर्गवारीत विभागला आहेः प्रार्थना करण्याद्वारे, देणगी देण्याद्वारे, आणि वितरण कार्याद्वारे.
आमचा स्वतःचा अनुभव असा आहे की जेव्हा देवाच्या लोकांचा गट अशा प्रार्थनेत सहभागी होईल, तेव्हा काही वर्षांत हे विशिष्ट मुद्दे प्रत्ययास येतील. आम्ही प्रामाणिकपणे आशा बळगतो की ही पुस्तके सत्याचे पूर्ण ज्ञान मुक्तपणे पसरवत असता अनेकजण अशा मार्गाने प्रार्थना करु शकतील.
रेमा ही ना नफा तत्त्वावर काम करणारी संस्था 1982 साली अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यामध्ये स्थापन करण्यात आली. रेमाला देण्यात येणाऱ्या देणग्या,अमेरिकेच्या अंतर्गत महसूल कायदा भाग 501(c)(3) नुसार करमुक्त आहेत. रेमाचे आर्थिक व्यवहार प्रशासित करणारे स्वतंत्र संचालक मंडळ आहे.
द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हालवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही घालता त्याच मापाने तुम्हाला परत घातले जाईल.
यास्तव तुम्ही जाउन सर्व राष्ट्रांना शिष्य करा; बापाच्या व पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना बाप्तिस्मा द्या. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज्ञापिल्या त्या सर्व पाळायला त्यांना शिकवा; आणि पाहा, काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.
ज्या कोणाला जगाच्या निरनिराळ्या भागांमध्ये मोफत साहित्य वितरणामध्ये भाग घेण्याची इच्छा असेल, अशांनी कृपया आम्हाशी संपर्क साधावा.
आमची पुस्तके तुम्हास पवित्र शास्त्र जाणण्यासाठी, ख्रिस्ताविषयी शिकण्यासाठी तुम्हास मदत करू शकतात, आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनाकरता प्रात्यक्षिक मदत पुरवू शकतात. ही मालिका ३ संचातील ७ पुस्तकांची आहे. ह्या मालिकेतील विषय प्रगती करतात आणि प्रत्येकाकरता अद्भूत पुरवठा आहेत.
अधिक जाणा