क्लेशाच्या आणि त्रासाच्या परिस्थितींमध्ये कसा प्रतिसाद द्यावा, याबाबत, लोक पुष्कळदा फारच गोंधळलेले किंवा अस्पष्ट असतात. अनेकजण अशा समयी प्रार्थनेकडे वळतात, परंतु, आम्ही कशासाठी प्रार्थना करायची, आणि आम्ही कशी प्रार्थना करायची? एक अगदी साधा आणि सहज उपयोगी पडणारा मार्ग म्हणजे, पवित्र शास्त्रामध्ये (बायबलमध्ये) नमूद केल्याप्रमाणे प्रभूच्या नावाचा धावा करणे (रोम. 10:13). धावा करणे ही विशिष्ट प्रकारची प्रार्थनाच आहे; ती केवळ एक विनंती किंवा संभाषण नाही, तर आत्मिक श्वसनाचा सराव आहे, जो आम्हाला जिवंत बनवतो आणि आमचे आत्मिक सामर्थ्य टिकवून ठेवतो.