विजयी ख्रिस्ती जीवन जगण्याकरता आपणास ७ अनिवार्य अनुभवांची गरज असणे
येथे आपल्या मोफत ख्रिस्ती पुस्तकांच्या मालिकेत ७ अनुभवे आढळतात जे आम्हाला विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यास मदत करतात. ही यादी सर्वांगीण नाही तर फक्त काही ख्रिस्ती मूलभूत अनुभवे दर्शवितात ज्या अनुभवांमध्ये तुम्ही पुढे आणले जाउ शकता. ख्रिस्ताने वधस्तंभावर सैतानावर विजयी मिळविला आणि विजयी असण्याचा आमचा मार्ग म्हणजे या ख्रिस्ताच्या विजयाला टिकवून ठेवणे होय. आमच्या पुस्तकांच्या मालिकेत अनेक विषयांवर आढावा घेण्यात आलेला आहे जे आम्हाला आमच्या प्रतिदिन जीवनात ख्रिस्ताचा विजय टिकवून ठेवण्यास मदत करतात.
-
आम्हाला देवाचा उद्देश जाणण्याची आणि त्यानुसार जीवन जगण्याची गरज आहे तेव्हा आम्हाकडे विजयी असण्याची भावना असेल. आमच्या मालिकेत पवित्र शास्त्रातील देवाचा उद्देश आणि प्रात्यक्षिक मार्ग उघड करतात जेणेकरून त्याच्या उद्देशनुसार आपण जीवन जगू शकू.
-
आम्ही ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे विजय मिळवितो. ह्या गोष्टीचा आमच्या पुस्तकांच्या मालिकेत सुरवातीपासून शेवटपर्यंत, प्रथम – ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका एक, यामध्ये असलेल्या, “ख्रिस्ताचे मोलवान रक्त” या तिसऱ्या प्रकरणात, नंतर सर्व-समावेशक ख्रिस्त या पुस्तकात आणि शेवटी गौरवशाली मंडळी या पुस्तकातही आढावा घेण्यात आलेला आहे.
त्याला तर त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे जिंकले....प्रकटीकरण १२:११अ.
-
आम्हाकडे ख्रिस्ताला खोलवर जाणणे आणि अनुभवणे असायला हवे जेणेकरून आपण पूर्णपणे विश्वासाने भरलेले असू.
आपण यहोशवा आणि कालेब यांचे उदाहरण अनुसरू या. त्यांच्याकडे विश्वासाने भरलेली हृदये होती. ते लोकांना सांगू शकले. “आपण आत्ताच तेथे जाऊ आणि ती ताब्यात घेऊ; कारण विजय मिळवण्यास आम्ही चांगले समर्थ आहोत” (गणना १३:३०). – सर्व-समावेशक ख्रिस्त, प्रकरण – १३.
-
विजयी जीवन हे आपण पुनर्जनितीकरणात जे प्राप्त करतो त्याच्यावर अवलंबून आहे. पुनर्जनितीकरणाद्वारे आम्हाकडे सर्वकाही आहे जे आम्हाला वाढण्याद्वारे आणि प्रगल्भ होण्याद्वारे विजयी जीवन जगण्याकरता गरजेचे आहे.
पुनर्जनितीकरणाच्या माध्यमातून आपण नवीन हृदय आणि नवीन आत्मा प्राप्त करतो. पुनर्जनितीकरणाद्वारे आपण पुढे पवित्र आत्मा, ख्रिस्त आणि स्वत: देव मिळवतो. हे खरोखर आपल्यासाठी पुरेसे आहे – आम्हाला पवित्र आणि आत्मिक बनविण्यासाठी पुरेसे आहे, आम्हाला विजयी बनविण्यास आणि भरारी मारायलाही लावण्यास पुरेसे आहे आणि आपल्याला जीवनात वाढण्यास आणि प्रगल्भ होण्यासही पुरेसे आहे.
-
आम्ही विजयी जीवन जगण्याकरता आपल्या मानवी आत्म्याकडे कसे वळू शकतो हे शिकण्याची गरज आहे.
जेव्हा एखादी कठीण परिस्थिती तुम्ही सहन करु शकत नाही आणि तुमच्या शक्ती पलीकडे तुम्ही दबलेले असता तेव्हा तुम्ही आत्म्याकडे वळा आणि येशूकडे पाहा. त्या सर्वांच्या अगदी वर तुम्ही चढाल, सर्वपार आणि विजयी. सर्व काही तुमच्या पायाखाली असेल. – देवाची व्यवस्था, प्रकरण – ११.
-
आम्ही आपल्या मनाला आत्म्यावर लावण्यास लक्षात ठेवायलाच पाहिजे, हा विजयी ख्रिस्त जीवन जगण्याचा प्रात्यक्षिक मार्ग आहे. आपले मन हे आपल्या जीवाचा पुढाकार घेणारा भाग आहे आणि तोही आपल्या जगण्याला दिशा देतो – जेथे आपले मन लावले असते ते आपल्या जगण्याला निर्धारित करते.
कारण देहाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे....रोमकरांस पत्र ८:६.
जर आम्ही फक्त योहान ३:१६ लक्षात ठेवले आणि रोमकरांस पत्र ८:६ विसरुन गेलो तर आम्ही दीनरित्या तारण पावलेले ख्रिस्ती आहोत; आम्ही कधीही विजयी ख्रिस्ती होऊ शकणार नाही. सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी योहान ३:१६ पुरेसे आहे परंतु विजयी ख्रिस्ती कसे व्हावे हे आम्हास रोमकरांस पत्र ८:६ हे वचन दाखवून देते. – देवाची व्यवस्था, प्रकरण – १७.
-
आम्ही मंडळीला आणि देवाच्या उद्देशामध्ये मंडळीची भूमिका जाणण्याची गरज आहे. विजय म्हणजे निव्वळ वैयक्तिक गोष्ट नाही; हे अंतिमतः मंडळीद्वारे पूर्णत्वास आणले जाते. हे पाहणे आपल्याला अनुभवामध्ये मार्ग निर्देशित करेल.
त्याचा उद्देश असा आहे की विजयी ख्रिस्त अधिक विजयशाली मंडळी असावी, ख्रिस्त जो सैतानाच्या कामावर विजयी झाला आहे तो, अधिक मंडळी, जिने सैतानाचे काम उलथून टाकले आहे. – गौरवशाली मंडळी, प्रकरण – २.
सरते शेवटी, “विश्वासामध्ये तेथे उद्या नाही; ते नेहमीच आज आहे.” विजयी ख्रिस्ती जीवन जगणे ही आजची बाब आहे, म्हणून तुम्ही आज काय करणार आहात? आम्ही आपणास सुचवितो, विनंती करतो की या पुस्तकांची मालिका वाचण्यास सुरुवात करा. https://www.rhemabooks.org/mr/order-free-books/