माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विसावा देईन

माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विसावा देईन

जेव्हा प्रभू येशू पृथ्वीवर होता, त्याने अनेकवेळा आमंत्रित करणारा हा शब्द उच्चारला : या. “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.” (मत्तय. ११:२८). “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या;...कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.” (मार्क १०:१४). “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.” (योहान. ७:३७). विसाव्याकरता आणि जीवनाकरता त्याच्याकडे येण्यास प्रभू आम्हास सदैव आमंत्रित करतो.

प्रभूच्या वतीने, तो आम्हास कृपाळूपणे येण्यासच सांगतो असे नाही; परंतु आमच्या वतीने, जे आम्ही, जड ओझ्यांखाली श्रम करतो त्या कारणास्तव देखील आम्ही येण्याची तातडीची गरज आहे. आमचे युग हे असाधारणपणे चिंतेचे युग आहे – नैसर्गिक आपत्तींविषयी चिंता, आजार आणि साथीचे रोग आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ याविषयीची चिंता, आतंकवादाच्या भयापासून येणारी चिंता, अनिश्चित अर्थव्यवस्थेतेबाबतची चिंता. आम्ही स्वत:ला विचारतो की आम्ही आमची नोकरी टिकवून ठेवण्यास समर्थ असू काय. आम्ही स्वत:ला विचारतो की आम्हास पुरेसे अन्न आणि औषधोपचार मिळेल काय. आम्ही स्वत:ला विचारतो की आमच्या लेकरांच्या वाट्याला कोणत्या प्रकारचे जग येईल. ओह, आम्ही येण्याची आणि कित्येक ओझी आणि चिंतांपासून आमच्या स्वत:ला मुक्त करण्याची किती गरज आहे!

पापाच्या समस्येच्या कारणास्तव देखील आम्ही येण्याची तातडीची गरज आहे. आम्ही आमच्या सद्सद्विवेकात जाणतो की ह्या विश्वात पवित्र देव आहे, आणि आम्ही सरळ आणि नैतिक जीवन जगायला हवे. परंतु आम्हाकडे समस्या आहे – आम्ही ते जगू शकत नाही. आम्ही सर्वांनी अगणित वेळा देवाविरूद्ध पाप केले आहे आणि मानवाविरूद्ध पाप केले आहे. मग आम्ही कसे येऊ शकतो? आम्ही यावे याकरता येशूला काय हवे आहे?

उत्तर आहे – काहीच नाही! येशूला निखालसपणे काहीही नको आहे, कारण आम्ही यावे याकरता त्याने पूर्ण तरतूद आधीच करून ठेवली आहे. पवित्र शास्त्र म्हणते की, “आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर (येशूवर) लादले” (यशया ५३:६). आमच्या पापांकरता सर्व शिक्षा त्याने सहन केली असल्याकारणाने आमच्याकडून कोणत्याही गोष्टीची त्याची मागणी नाही. आमच्या पापांकरता आम्ही आणखी दंड भरणार नाही कारण येशूने आम्हाकरता त्याचे रक्त सांडले आणि तो सर्व दंड भरला! त्याने सर्व ऋण चुकते केले, म्हणून जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्ही खात्री बाळगू शकतो की आमच्या पापांची क्षमा होईल. मग तो मृतांमधून पुनरूत्थित झाला आणि जीवन देणारा आत्मा बनला (१ करिंथ. १५:४५), जेणेकरून तो आम्हामध्ये येऊ शकेल आणि आमची आंतरीक शांती आणि विसावा बनू शकेल.

प्रभू येशू चांगल्या कामांची मागणी करत नाही; तो चांगल्या चारित्र्याची मागणी करत नाही; तो योग्यतेच्या पुराव्याची मागणी करत नाही – तो फक्त म्हणतो “या.” आणि जे येतात त्यांना, तो विनाअट अभिवचन देतो : “जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही.” (योहान. ६:३७). आता आम्ही सर्वांनी जे करण्याची गरज आहे ते म्हणजे त्याजकडे येणे. आणि येणे याचा अर्थ काय आहे? येणे याचा अर्थ प्रभूच्या समीप येणे. येणे म्हणजे त्याचा धावा करणे. येणे म्हणजे त्याजमध्ये विश्वास ठेवणे आणि त्याचा स्वीकार करणे.

अगदी ह्या क्षणाला तुम्ही जसे आहात तसे तुम्ही यावे याकरता प्रभू येशू वाट पाहत आहे. तुमच्या सध्याच्या पापांसह या. तुमच्या सध्याच्या भयांसह या. तुम्ही जसे आहात तसे या. तुमच्या स्वत:मध्ये सुधारणूक होण्याची वाट पाहू नका – तो दिवस कधीही येणार नाही.  आमच्यासाठी सोसलेल्या येशूच्या मरणाने आमची प्रत्येक उणीव भरून काढली आहे. वाट पाहण्याची गरज नाही—फक्त या. जर तुम्ही याल, जर तुम्ही येशूमध्ये विश्वास ठेवाल, जर तुम्ही तुमचे हृदय उघडाल आणि त्याच्याकडे आक्रोश कराल, तर तो तुमचा स्वीकार करेल. त्याचे अभिवचन सर्वकाळसाठी निश्चित आहे — “जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही.” फक्त या.

“प्रभू येशू, मी कबुल करतो की मी पापी आहे, मी कबुल करतो की माझ्याकडे भय आणि शंका आहेत, परंतु मी आता तुझ्याकडे येतो. तुझ्या मोलवान रक्ताद्वारे मला माझ्या पापांपासून शुद्ध करण्यास मी तुला सांगतो, आणि मी तुझ्या अभिवचनावर विश्वास ठेवतो की तू मला मुळीच घालवून देणार नाही. म्हणून मी जसा आहे तसा, मी तुझ्याकडे येतो, आणि मी तुझ्या शब्दाद्वारे जाणतो की तू माझा स्वीकार करशील. मी तुला सांगतो तू माझ्यामध्ये ये. प्रभू येशू, मी फक्त येतो जेणेकरून मी तू माझा विसावा असशील.”


इतरांसह वाटून घ्या