मानवी जीवनाचे रहस्य

मानवी जीवनाचे रहस्य

तुम्हास याचे कधी कुतूहल वाटले आहे का, की तुम्ही या जगात का जगत आहात आणि तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? हे रहस्य उलगडणाऱ्या सहा किल्ल्या आहेत.

1. देवाची योजना

देवाची अभिलाषा स्वतःला मानवाद्वारे व्यक्त करण्याची आहे (रोम. 8:29). या उद्देशाने, त्याने मानवाला आपल्या स्वतःच्या प्रतिरूपात बनवले (उत्पत्ती 1:26). ज्याप्रमाणे हातमोजा हा, त्यामध्ये हात सामावला जावा म्हणून हाताच्या प्रतिरूपाचा बनवलेला असतो, त्याचप्रमाणे देवाला सामावून घेण्यासाठी मानवसुद्धा देवाच्या प्रतिरूपाचा बनवलेला आहे. मानव, आपणामधील समाविष्ट बाब म्हणून देवाला स्वीकारण्याद्वारे, देवाला व्यक्त करू शकतो (2 करिंथ. 4:7).

2. मानव

त्याची योजना पूर्ण करण्यासाठी, देवाने मानवाला पात्र असे घडवले आहे (रोम. 9:21-24). या पात्राला तीन भाग आहेतः शरीर, जीव आणि आत्मा (1थेस्सल. 5:23). शरीर भौतिक राज्यातील गोष्टींशी संपर्क साधते आणि त्या स्वीकारते. जीव, मानसिक शक्ती, मानसिक राज्यातील गोष्टींशी संपर्क साधतो आणि त्या स्वीकारतो. आणि मानवी आत्मा, मानवाचा सर्वात आतील भाग, देवाशी संपर्क साधण्यासाठी आणि देवाला स्वतःला स्वीकारण्यासाठी बनवण्यात आला होता (योहान 4:24). मानवाची निर्मिती, त्याने आपल्या पोटात अन्न भरून घेण्यासाठी, किंवा त्याच्या मनामध्ये ज्ञान भरून घेण्यासाठी फक्त केलेली नव्हती, तर त्याच्या आत्म्यात देवाला सामावून घेण्यासाठी केलेली होती (इफिस. 5:18).

3. मानवाचे पतन

परंतु, मानवाने आपल्या आत्म्यात आपले जीवन म्हणून देवाला स्वीकारण्यापूर्वीच, पापाने त्याच्यामध्ये प्रवेश केला (रोम. 5:12). पापाने त्याचा आत्मा मृतःप्राय केला (इफिस. 2:1), त्याच्या मनामध्ये त्याला देवाचा शत्रू बनवले (कलस्सै. 1:21), आणि त्याचे शरीर पापमय देहामध्ये रूपांतरीत केले (उत्पत्ती 6:3; रोम.6:12). अशा रितीने, पापाने मानवाला देवापासून तोडत त्याच्या तीनही भागांना नुकसान पोहोंचवले. या अशा स्थितीमध्ये, मानव देवाला प्राप्त करू शकत नव्हता.

4. देवाच्या वाटणी करता ख्रिस्ताचे उद्धारकार्य

असे असले तरी, मानवाच्या पतनाने देवाला त्याची मूळची योजना अंमलात आणण्यापासून परावृत्त केले नाही. त्याची योजना पूर्ण करण्यासाठी, प्रथम देव, येशू ख्रिस्त म्हटलेला मानव बनला (योहान 1:1,14). मग, मानवाला उद्धरण्यासाठी ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला (इफिस. 1:7), अशारितीने त्याने मानवाचे पाप दूर केले (योहान 1:29) आणि त्याला पुन्हा देवाकडे आणले (इफिस. 2:13). सरतेशेवटी, पुनरुत्थानात, तो जीवन देणारा आत्मा बनला (1करिंथ. 15:45ब) यासाठी की तो त्याचे अगाध समृद्ध जीवन मानवाच्या आत्म्यामध्ये वाटू शकेल (योहान. 20:22; 3:6).

5. मानवाचे पुनर्जनितीकरण

ख्रिस्त, जीवन देणारा आत्मा बनल्यामुळे, आता मानव त्याच्या आत्म्यामध्ये देवाचे जीवन स्वीकारू शकतो. पवित्र शास्त्र याला पुनर्जनितीकरण म्हणते (1पेत्र. 1:3; योहान 3:3). हे जीवन मिळवण्यासाठी, माणसाने देवाकडे पश्चाताप करण्याची आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे (प्रे.कृ. 20:21; 16:31).

पुनर्जनित होण्यासाठी, खुल्या आणि प्रामाणिक अंतःकरणाने फक्त प्रभूकडे या आणि त्याला म्हणाः

प्रभू येशू, मी पापी आहे. मला तुझी गरज आहे. तू माझ्यासाठी मरण पावलास म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू येशू, माझी क्षमा कर. माझ्या सर्व पापांपासून मला स्वच्छ कर. तू मरणातून पुन्हा उठला आहेस असा मी विश्वास ठेवतो. मी या क्षणी तुला माझा तारणारा आणि जीवन म्हणून स्वीकारतो. माझ्यामध्ये ये! तुझ्या जीवनाने मला भर! प्रभू येशू, मी स्वतःला तुझ्या हाती तुझ्या उद्देशासाठी सोपवून देतो

6. देवाचे पूर्ण तारण

पुनर्जनितीकरणानंतर, विश्वासणाऱ्याचा बाप्तिस्मा होण्याची गरज आहे (मार्क. 16:16). नंतर देव हळूहळू विश्वासणाऱ्याच्या आत्म्यामधून त्याच्या जीवामध्ये, जीवन या स्वरूपात स्वतःला पसरून टाकण्याची जीवनभर चालणारी प्रक्रिया सुरू करतो (इफिस 3:17). ही प्रक्रिया, जिला रूपांतरण (रोम. 12:2) म्हटले आहे, तिला मानवी सहकार्याची आवश्यकता आहे (फिलिप्पै. 2:12). विश्वासणारा त्याची इच्छा, विचार, आणि निर्णय, हे ख्रिस्ताची इच्छा, विचार, आणि निर्णय यांच्याशी एक होईतोपर्यंत प्रभूला त्याच्या जीवामध्ये पसरण्याची परवानगी देउन सहकार्य करतो. शेवटी, ख्रिस्ताच्या पुनरागमनसमयी, देव, त्याच्या जीवनाने विश्वासणाऱ्याचे शरीर पूर्णपणे संपृक्त करेल. याला गौरवीकरण म्हटले आहे (फिलिप्पै. 3:21). या प्रकारे प्रत्येक भागात रीते आणि हानीग्रस्त राहण्यापेक्षा हा मानव देवाच्या जीवनाने भरला जातो आणि संपृक्त होतो. हे देवाने दिलेले पूर्ण तारण होय! असा मानव आता देवाला व्यक्त करतो, देवाची योजना पूर्ण करतो.

हे जीवन स्वीकारल्यानंतर विश्वासणाऱ्याने देवाच्या जीवनाद्वारे पोषण आणि पुरवठा प्राप्त करण्यासाठी ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तो ह्या जीवनामध्ये वाढेल आणि प्रगल्भ होईल. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये इतर विश्वासणाऱ्यांच्या सहभागीतेत विश्वासणारा ख्रिस्ताच्या सान्निध्याची समृद्धी आस्वादू शकतो.

हे ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, भाग १ मधील पहिले प्रकरण आहे, वाचन पुढे चालू ठेवण्याकरता तुम्ही तुमच्या मोफत प्रतीसाठी विनंती करू शकता.


इतरांसह वाटून घ्या