कोरोना विषाणूच्या (COVID-19) साथीचा रोग सर्वत्र पसरलेला असताना आम्ही काय करावे?

कोरोना विषाणूच्या (COVID-19) साथीचा रोग सर्वत्र पसरलेला असताना आम्ही काय करावे?

संपूर्ण पृथ्वीभर कोरोना विषाणूच्या अलीकडील दु:खदायक उद्रेकाने, आम्ही सर्वजण ह्यामार्गाने किंवा त्यामार्गाने प्रभावित झालेलो आहोत. ह्याला अनेकांचा प्रतिसाद निराशा आणि भय असा आहे. परंतु प्रतिसाद देण्यासाठी आणखी एक मार्ग आहे – आणि तो म्हणजे देवाचा शोध घेणे!

देव म्हणतो की साथीच्या रोगाचा समय लोकांनी “दीन होउन माझी प्रार्थना करण्यासाठी” (२ इति. ७:१४) विशेष सुसंधी देतो. “शांतीचा देव स्वत:” (१ थेस्सल. ५:२३) फक्त स्वर्गात राहाण्याची इच्छा बाळगत नाही, तर त्याची इच्छा आहे आम्हाद्वारे त्याचा शोध घेतला जावा आणि आम्हास शांती असावी. येशू आम्हास सांगतो, “तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरहि विश्वास ठेवा” (योहान. १४:१). आम्ही अस्वस्थ होण्याची गरज नाही. आम्ही चिंतेमध्ये आणि भयामध्ये राहण्याची आवश्यकता नाही. तेथे आणखी एक मार्ग आहे. “प्रभू समीप आहे” (फिलिप्पै. ४:५).

परंतु जर देव स्वर्गात आहे, तर तो आमच्या समीप कसा असू शकतो? पवित्र शास्त्र आम्हास सांगते की देव आमचे जीवन आणि आमची शांती असण्यासाठी टप्प्यांच्या मालिकांमधून गेला. तो स्वर्गातून खाली आला आणि २००० वर्षांपाठीमागे येशू नावाचा मानव बनण्यासाठी देहधारी झाला जेणेकरून तो आम्हासह राहू शकेल आणि आमची मानवी स्थिती प्रत्यक्षपणे अनुभवेल. येशू, मानवी जीवन कसे असावे – आम्हास दु:खी करते त्या पापाच्या विषाद्वारे कोणतीही इजा न झालेले, आणि त्या विषाचा मुख्य परिणाम, जो आहे मरण, त्याच्या कधीही अधीन न झालेले – याचा नमुना म्हणून ह्या पृथ्वीवर परिपूर्ण मानवी जीवन जगला. येशूने सकारात्मकरित्या मानवी इतिहासावर जेवढा प्रभाव पाडला तेवढा इतर कोठल्याही मानवाने पाडला नाही. जेथे कोठे येशू गेला, तेथे त्याने त्याचा शोध घेणाऱ्यांसाठी शांती आणली.

नंतर, मरण आणि पापाची समस्या सोडवण्यासाठी, आमची बदली व्यक्ती यानात्याने, आमच्या वतीने मरण सहन करण्यासाठी येशू वधस्तंभावर गेला (यशया ५३:४-६). वधस्तंभावर, तो पापाच्या विषावरचा दैवी उतारा – जो आहे पाप आणि मरण गिळंकृत करण्याकरता आम्हामध्ये भरले जावे यासाठी मुक्त केलेले त्याचे सार्वकालिक जीवन – उत्पन्न करण्यासाठी समर्थ होता. आमच्या पापांची आम्हास क्षमा देण्याकरता, तो आम्हाकरता मरण पावला जेणेकरून आम्ही पवित्र आणि नितीमान देवासह शांतीत असू (इफिस. २:१३-१४) आणि नाश पावणार नाही तर येशूमध्ये विश्वास ठेवण्याद्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त करू (योहान. ३:१६). त्याचे मरण आणि पुनरूत्थान याकरवी, आम्हाला देवासह आणि इतरांसह शांती असू शकते. नंतर, त्याच्या पुनरूत्थानाच्या सायंकाळी, तो त्याच्या शिष्यांना प्रगट झाला आणि म्हणाला, “तुम्हास शांती असो” आणि त्यांच्यावर फुंकर टाकत म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा” (योहान. २०:२१-२२).

आता, आज, “ते वचन तुझ्याजवळ, तुझ्या तोंडात व तुझ्या हृदयात आहे.....यासाठी की तू आपल्या तोंडाने येशूला प्रभू म्हणून पत्करशील, आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा तू आपल्या अंत:करणात विश्वास धरशील, तर तुझे तारण होईल” (रोम. १०:८,९). ह्या जगातील पाप, अंधकार, आणि मरण यापासून सुटण्यासाठी आणि येशूला तुमची शांती म्हणून स्वीकारण्यासाठी साधा मार्ग म्हणजे पुढीलप्रमाणे प्रार्थना करणे :

प्रभू येशू, मी तुझ्यामध्ये विश्वास ठेवतो! प्रभू येशू, मला पाप आणि मरण यापासून वाचव! प्रभू येशू, मी तुला माझे जीवन आणि माझी शांती म्हणून स्वीकारू इच्छितो! प्रभू येशू, माझ्यामध्ये जगण्यासाठी आणि माझ्यामध्ये येण्याकरता मी तुझे आभार मानतो!

येशूला स्वीकारण्यासाठी तुम्ही प्रार्थना केल्यानंतर, नियमितपणे त्याच्यासह सहभागीता करण्याची सवय तुम्ही लावून घेऊ शकता. देवासह सहभागीता करणे म्हणजे निव्वळ अस्सल मार्गाने त्याच्यासह संभाषण करणे होय. “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा” (फिलिप्पै. ४:६). प्रार्थनेतून त्याच्याकडे या. तुमच्या काळजी त्याच्यापुढे खुल्या करा आणि तो कोण आहे आणि त्याने तुम्हाकरता काय केले आहे या करता त्याचे आभार माना. असे करण्याने, तुम्ही त्याच्या तारणामध्ये प्रवेश करू शकाल, “म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंत:करणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्याठायी राखील.” (व. ७).

देव कोण आहे याविषयी आणि आणि त्याने येशूमध्ये आम्हाकरता काय केले आहे ह्याविषयी अधिक जाणण्यासाठी, आमच्या वेबसाईटवरून काही मोफत पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी आम्ही तुम्हास आंमत्रित करत आहोत :

https://www.rhemabooks.org/mr/free-christian-books/


इतरांसह वाटून घ्या