जगाचा अंत कधी होईल?
जेव्हा केव्हा नैसर्गिक आपत्ती, जशा की, सर्वत्र पसरलेला साथीचा रोग, भूकंप, वादळ/चक्रीवादळ, पूर इ., येतात, तेव्हा लोक स्वत:ला विचारतात की जगाचा अंत कधी होईल. हा गंभीर प्रश्न आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. काही लोक हा प्रश्न विचारतात कारण ते मरणाला घाबरत असतात. इतर लोक न्यायाच्या दिवसाला घाबरत असतात, तरी इतर आशा करत असतात की आम्ही ज्यामध्ये आहोत त्या कुरूप गोंधळाचा देव त्वरेने अंत करेल आणि त्याचे प्रीतीचे आणि नितीमत्वाचे राज्य आणेल जेणेकरून मानव शांतीत आणि आनंदात राहिल.
ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यास, एकमेव लायक अधिकारी, देव, तो त्याच्या विश्वासू संदेष्ट्यांकरवी बोलला आहे. आणि त्याचे बोलणे एका पुस्तकामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये, लिहून ठेवण्यात आले आहे आणि संकलीत करण्यात आले आहे (मत्तय. २४:३६). आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर पवित्र शास्त्रानुसार देऊ आणि पाहू की सध्याचे युग केव्हा समाप्त होईल.
निर्मिती करण्यापाठीमागील देवाचा उद्देश
आकाश आणि पृथ्वी केव्हा समाप्त होतील हे आम्ही समजून घेऊ शकण्यापूर्वी, आम्ही जाणायलाच हवे की देवाने आकाश आणि पृथ्वी का उत्पन्न केली. निर्मिती करण्यापाठीमागील देवाचा उद्देश आहे त्याच्या प्रतिमेमध्ये निर्माण केलेल्या, जीवन म्हणून तो जो आहे त्या त्याच्याद्वारे भरलेल्या, त्याला व्यक्त करण्यासाठी आणि संपूर्ण पृथ्वीवर त्याच्याकरता सत्ता चालवण्यासाठी सामुदायिक मानव म्हणून बांधले गेलेल्या लोकांचा गट त्याला लाभावा (उत्पत्ती १:२६). हे आम्हास सूचित करते की हा सामुदायिक मानव बांधला जाण्याविना युगाचा अंत होणार नाही (इफिस. ४:१२). देव अजूनही ह्या त्याच्या सर्वश्रेष्ठ हस्तकृतीवर काम करत आहे, आणि तुम्ही त्या हस्तकृतीचा भाग असू शकता (इफिस.२:१०).
पृथ्वीचा वापर तिला संपवत आहे
हे विश्व विश्वास बसणार नाही इतके पुरातन आहे. सध्याचा एक अंदाज हा आहे की हे विश्व १३.८ अब्ज वर्षांमागे निर्माण केले होते. देवाने मानव निर्माण केल्यापासून, मानव पृथ्वीची साधनसंपत्ती उपयोगात आणत आहे. मागील शतकात, ह्या साधनसंपत्तीचा मानव करत असलेला उपयोग आश्चर्यकारकरीत्या वाढलेला आहे, ह्या मर्यादेपर्यंत वाढलेला आहे की त्यांचा वेगाने ऱ्हास होत आहे. जर हा उपयोग सध्याच्या गतीने चालू राहिला, तर आम्हास उपलब्ध असणारे तेलाचे साठे पुढील शतकांपर्यंत राहू शकणार नाहीत. ओझोनच्या थराला पडलेली भगदाडे मोठ्या प्रमाणात त्वचेचा कर्करोगाच्या घटनात वाढ करत आहे. हरितगृहांपासून निर्माण होणारे वायू वातावरणात वाढत आहेत, त्यामुळे संपूर्ण गोलार्थ उष्ण बनत आहे, आणि अधिक दुष्काळ, अग्नी, आणि पूर यासह हवामानाची स्थिती बदलत आहे. वादळे, चक्रीवादळे यासारख्या हवामानाच्या कमालीच्या गोष्टी अधिक वारंवार आणि प्रखरपणे घडत आहेत. जंगले कमी होत आहेत; वन्यजीवांकरता वस्तीस्थाने कमी होतील, आणि प्राणवायू तयार करण्याकरता कमी वनस्पती असतील. समुद्राची पातळी वाढत आहे आणि अब्जावधी लोकांच्याद्वारे वस्ती केलेल्या किनारपट्टीची भूमी झाकून टाकत आहे. जलप्रस्तर पातळी कमी होत आहे, जेथे ताज्या पाण्याची अत्यंत गरज आहे तेथे ताज्या पाण्याची उणीव निर्माण करत आहे. रासायनिक आणि अणु कचरा आमच्या ताज्या पाण्याच्या पुरवठ्यामध्ये आणि समुद्रामध्ये झिरपला जात आहे. प्रत्येक सेकंदाला हवा प्रदूषित होत आहे, अनेक नागरी भागांमध्ये श्वसनाच्या गंभीर समस्या वाढण्यास कारणीभूत होत आहे. जगाच्या लोकसंख्येचा वेगाने स्फोट होत आहे. जगण्याकरता आवश्यक असलेल्या अन्नाची आणि इतर उपयुक्त गोष्टींच्या पुरवठ्याची मागणी आमच्या किंवा आमच्या लेकरांच्या जीवनसमयात कमालीची वाढलेली असेल. अगदी मोठ्या अणु युद्धाविना देखील, पृथ्वी ३० ते ५० वर्षात आज आम्ही राहतो त्या ग्रहासारखी राहणार नाही. पवित्र शास्त्र आम्हास सांगते की एके दिवशी पृथ्वीची उपयुक्तता संपून जाईल, आणि जुने वस्त्र जसे जाळून टाकावे त्याप्रमाणे ती गुंडाळले जाईल (इब्री. १:१०-१२; २ पेत्र. ३:१२).
जगाच्या समाप्तीकडे नेणारे दिवस
जगाचा अंत कधी होईल हे पवित्र शास्त्र सांगत नाही. तो तास किंवा दिवस आम्हास ठाऊक नाही (मत्तय. २५:१३), परंतु जगाच्या अंताकडे नेणारे दिवस कशासारखे असतील हे ते आम्हास सांगते. शेवटच्या दिवसांदरम्यान, तेथे लढाया, लढायांच्या अफवा, दुष्काळ, आणि भूमिकंप असतील (मत्तय. २४:६-७). शेवटल्या दिवसात अनीतीचे वाढलेले वातावरण असेल (मत्तय. २४:१२). देवाप्रती आणि इतर लोकांप्रती अनेक लोकांची प्रीती थंडावली जाईल (मत्तय. २४:१२). जीवन अनेक चिंतांनी भरलेले असेल आणि या कारणांमुळे, या चिंतामधून सुटण्याचा प्रयत्न करण्यासाठी लोक सर्व प्रकारच्या दुर्व्यसनात आणि दारूबाजीत सहभागी होतील (लूक. २१:३४). पवित्र शास्त्र आम्हास जगाच्या अंतापर्यंतच्या चार घोड्यांच्या शर्यतीचे उदाहरण देखील देते (प्रकटी. ६:१-८). चार घोडे आहेत सुवार्ता, युद्ध, दुष्काळ, आणि मरण. ही शर्यत चालू राहिल आणि अगदी प्रखर बनेल. यापैकी कोणतीही गोष्ट निघून जाणार नाही, आणि गोष्टींमध्ये सुधारणा होईल याची जितकी अधिक आम्ही आशा करू, त्याप्रमाणे गोष्टी सुधारणार नाहीत, परंतु वाईट बनतील.
जगाचा अंत होईल तो मार्ग
तथापि, पवित्र शास्त्र आम्हास सांगते जग कसे समाप्त होईल. येथे पुढील मुख्य गोष्टी आहेत. जगाच्या अंतापूर्वीची सात वर्षे ही प्रत्येकी साडेतीन वर्षांच्या दोन विभागामध्ये विभागलेली आहेत. पहिली साडेतीन वर्षे शांतीदायक असतील. त्या कालावधीच्या अंतास, देवाने जीवन म्हणून असलेल्या त्याच्याने पूर्ण असलेला सामुदायिक मानव निर्माण करण्याचे त्याचे काम पूर्ण केलेले असेल (प्रकटीकरण १२:५). हे लोक आहेत विजयीजन. मग तो त्यांना स्वर्गाकडे घेईल. तेथे ते, सैतानाला, दियाबलला, पराभूत करतील आणि त्याला खाली पृथ्वीवर टाकतील (प्रकटीकरण १२:९-११; १४:१). मग अशुद्ध आत्मा ख्रिस्तविरोधक म्हटलेल्या दुष्ट मनुष्यामध्ये प्रवेश करेल, आणि सैतान त्याचा अधिकार त्याला देईल (प्रकटीकरण १३:२). हे जगाच्या शेवटच्या साडेतीन वर्षांचा आरंभ करेल. ह्या कालावधीला पवित्र शास्त्र महासंकटकाळ म्हणते (मत्तय. २४:११). त्यासमयी पृथ्वी असे ठिकाण राहणार नाही की जेथे कोणास राहू वाटेल (प्रकटीकरण ३:१०). ख्रिस्तविरोधक मानवतेला पुष्कळ नुकसान पोहचवेल, आणि त्याचसमयी, तेथे अनेक नैसर्गिक आणि अतींद्रिय आपत्ती असतील (प्रकटीकरण ११:१३). शेवटच्या साडेतीन वर्षाच्या समाप्तीस, हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी ख्रिस्तविरोधक आणि त्याच्या सैन्याचा नाश करण्यासाठी ख्रिस्त आणि त्याचे विजयीजन स्वर्गातून खाली येतील (प्रकटीकरण १६:१६; १९:१३-१६; १७:१४). मग देवाचे राज्य पृथ्वीकडे खाली आणले जाईल, आणि सैतान हजार वर्षांकरता बांधून ठेवला जाईल (प्रकटीकरण. २०:२). एक हजार वर्षाच्या समाप्तीस, सैतानाला थोडावेळ मोकळे सोडले जाईल. तो अधिक नुकसान पोहचवेल, परंतु नंतर तो अग्नीच्या सरोवरामध्ये टाकला जाईल (प्रकटीकरण १९:२०; २०:१०). सैतान आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा तेथे सर्वकाळसाठी न्याय केला जाईल. परंतु जे लोक देवाकडे वळतील आणि ज्यांनी स्वत:ला देवाने भरून घेण्यासाठी खुले केले असेल, ते देवामध्ये आणि देवासह नविन केलेल्या पृथ्वीवर सनातनकालाकरता राहतील (प्रकटीकरण ११:१५). तेथे हर्ष, शांती, आणि नितीमत्व असेल (प्रकटीकरण २२:३,५). तेथे आणखी अश्रू, उणीवा, आजारपण, चोरी, अनितीमत्व किंवा मरण असणार नाहीत (प्रकटीकरण २१:३-४).
महासंकटकाळादरम्यान, जगाच्या अंतासमयी जे येणार आहे त्या उध्वस्तपणापासून सुटण्याची जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही आज देवाकडे पश्चाताप करण्याची आणि त्याला स्वीकारण्याची आणि त्याच्या तारणाला स्वीकारण्याची गरज आहे (मत्तय. ४:१७; इफिसकरास पत्र ५:१८-१९; योहान. १०:१०). जर तुम्हाला सैतानाच्या नुकसानीपासून आणि देवाच्या न्यायापासून सुटण्याची इच्छा असेल, तर आम्ही तुम्हाला पुढीलप्रमाणे प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित करतो :
“ओ प्रभू येशू,! मला सैतानाच्या राज्यापासून देवाच्या राज्यामध्ये आण. मी सनातनकालाकरता तुझ्यामध्ये आणि तुझ्यासह राहू इच्छितो. माझ्यामध्ये माझे जीवन असण्यासाठी ये. मला आता तुझी गरज आहे जेणेकरून मी तुझ्या तारणामध्ये प्रवेश करीन.”
देवाविषयी व मानवजातीकरता असलेल्या त्याच्या योजनेविषयी अधिक वाचण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या :
https://www.rhemabooks.org/mr/articles/questions-about-god-man-and-what-is-happening-on-the-earth/